महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: १५,६३१ रिक्त पदांसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: १५,६३१ रिक्त पदांसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू

Maharashtra Police Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती २०२५ साठी मोठी संधी येत आहे! १५ सप्टेंबर २०२५ पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे पोलीस दलात कर्मचारी कमी पडत आहेत. नवीन पोलीस ठाणी उभारणे आणि विद्यमान ठाण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय अद्याप कागदावरच आहे. त्यामुळे २०२४-२५ मध्ये रिक्त झालेल्या सुमारे १०,००० पदांसह एकूण १५,६३१ पदांसाठी ऑक्टोबर २०२५ पासून भरती प्रक्रिया सुरू होईल. ही भरती प्रक्रिया विशेषतः वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी शेवटची संधी ठरणार आहे.

Maharashtra Police Bharti 2025 रिक्त पदांचा तपशील

राज्याच्या गृह विभागात सध्या १३,५६० पोलीस पदे रिक्त आहेत. यामध्ये पोलीस शिपाई, चालक शिपाई यांसह बँड्समन आणि राज्य राखीव पोलीस बलाची सुमारे १,५०० पदे समाविष्ट आहेत. प्रशिक्षण आणि विशेष पथक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांचा तपशील गृह विभागाला सादर केला आहे. सध्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ऑक्टोबरमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होईल.

अर्ज प्रक्रिया आणि नियम

उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकच अर्ज करता येईल. एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्यास परवानगी नाही. जर एखाद्या उमेदवाराने एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले, तर त्यापैकी फक्त एकच अर्ज वैध मानला जाईल. सध्या पावसाळा आणि गणेशोत्सवामुळे मैदानी चाचण्या घेणे शक्य नाही. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्ताच्या ड्युटीवर व्यस्त आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

नवीनतम अपडेटनुसार, ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होण्याची शक्यता आहे, तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

अधिकृत वेबसाइट https://policerecruitment2024.mahait.org/ वरून अर्ज करावे. लेखी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल आणि मराठी भाषेत घेतली जाईल. उमेदवारांना किमान ४०% गुण मिळवणे आवश्यक आहे.

Maharashtra Police Bharti 2025 भरती प्रक्रियेची वैशिष्ट्ये

  • पदांची संख्या: १५,६३१ (यामध्ये पोलीस शिपाई, चालक शिपाई, बँड्समन आणि राज्य राखीव पोलीस बल यांचा समावेश).
  • लेखी परीक्षा: मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • प्रक्रियेचा कालावधी: ऑक्टोबर २०२५ पासून सुरुवात होऊन टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल.
  • रिक्त पदांचे कारण: दरवर्षी सुमारे ५% पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त होतात, तर ४-५% कर्मचारी विभागीय चौकशी, स्वेच्छानिवृत्ती किंवा अपघाती मृत्यूमुळे रिक्त होतात.

पात्रता निकष

उमेदवारांची वय मर्यादा १८ ते २८ वर्षे असावी. मात्र, २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष नियमांनुसार अर्ज करण्याची संधी मिळेल. शैक्षणिक पात्रता म्हणून किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क सामान्य श्रेणीसाठी ४५० रुपये आणि राखीव श्रेणीसाठी ३५० रुपये असेल.

Maharashtra Police Recruitment 2025 उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

ही भरती प्रक्रिया विशेषतः वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे जे उमेदवार गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांनी ही संधी सोडू नये. अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकषांबाबत अधिक माहिती लवकरच गृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. नियमितपणे अधिकृत वेबसाइट तपासत राहा.

Vidarbha Academy App वर तुम्ही Live क्लास करू शकता : Download App 



पोलीस भरती २०२५ साठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा!

Leave a Comment

© 2026 Vidarbha Knowledge Corporation

About Us